Deola | देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनय देवरेंना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर

0
57
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विनय राजाराम देवरे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस उपायुक्त यांच्या परिपत्रकानुसार नाशिक ग्रामीण पोलीस विभागातील जिल्हा पोलीस आस्थापनेवरील पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती पदक, सन्मान चिन्ह व विशेष सेवा पदक देऊन उद्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली.(Deola)

पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे यांनी नाशिक, मालेगाव, कळवण, नांदगाव, जायखेडा या ठिकाणी हवालदार म्हणून आपली सेवा बाजाबली असून, सन २०२१ मध्ये त्यांना सहाय्य पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली. आता ते देवळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

Republic Day | अनुकंपा धारकांचा वनवास संपला; मंत्री भुसेंच्य हस्ते प्रजासत्ताक दिनी नियुक्ती पत्र वाटप

त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर सांगितले की, अशा प्रकारे सन्मानाचे पदक जाहीर झाल्याने प्रशासन सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे विभागात काम करण्याची जबाबदारी देखील आणखी वाढते. हा पुरस्कार मिळाल्याचे आनंद आणि समाधान असून, या पुढील काळात आणखी जोमाने विभागाची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यामुळे विनय देवरे यांचे सपोनि दीपक पाटील आदींसह विभागातील पोलिसांनी अभिनंदन केले आहे.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here