Deola | शरदराव पवार पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात

0
51
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा ‘शरदराव पवार नागरी सहकारी’ पतसंस्थेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. २५) रोजी संस्था कार्यालयात संचालक नितीन नवले यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली. या संस्थेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी आमदार शांताराम तात्या आहेर यांनी स्थापन केलेल्या या संस्थेला ३५ वर्ष पूर्ण होऊन, संस्था ३६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

Deola | महसूल विभागाच्या नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रक्रियेस स्थगिती

या पतसंस्थेची स्वमालकीची जागा असून, स्थापनेपासून संस्थेला लेखापरीक्षणाचा ‘अ’ ऑडिट वर्ग मिळत आहे. यावर्षी संस्थेने सर्व सभासदांना आकर्षक भेट वस्तूचे वाटप केले आहे. या पतसंस्थेने सभासद, ठेवीदार यांचा विश्वास संपादन केला आहे. तात्काळ कर्ज वाटप, वसुलीच्या कामात सुसूत्रता असल्याने थकबाकीचे प्रमाण नगण्य असून, वटवृक्षात रूपांतर केलेल्या या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक आदींनी भेट देऊन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी चेअरमन योगेश आहेर, व्हा. चेअरमन हिरामण आहेर, संचालक सर्वश्री तुळशीराम आहेर, बाळासाहेब मगर, अतुल आहेर, नानाजी आहेर, नितीन नवले, लीना आहेर, वनिता शिंदे, पुंडलिक आहेर, शंकर बच्छाव, नानाजी आढाव आदींसह व्यवस्थापक प्रमोद देवरे, बापू आहेर, रमेश जाधव, भिला सोनवणे, योगेश आहेर, तुषार मोरे, संदीप आहेर आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here