सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे (ता. देवळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत निर्लेखित करण्यात आली असून, याठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आता मुख्य इमारत व कर्मचारी निवास्थाने नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा पश्चिम भागातील खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचारी निवास्थानांची अत्यंत दुरावस्था झाल्याने या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे,अशी मागणी खर्डे व परिसरातील नागरिकांनी वाखारी गटातील जि.प च्या माजी सदस्या डॉ. नूतन आहेर यांच्याकडे केली होती. याकामी त्यांनी वेळोवेळी जि.प कडे पाठपुरवठा देखील केला होता. अखेर या कामाला केंद्र शासना कडून मंजुरी मिळाली. येथील जीर्ण इमारत पूर्ण जमीनदोस्त करण्यात आली असून, नव्याने बांधकाला सुरुवात करण्यात आली आहे. पश्चिम भागातील खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वात मोठे असून, या आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्रांचा व सोहळा गावांचा समावेश आहे.
Dada Bhuse | मंत्री दादा भूसेंनी मांडला राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अहवाल
मात्र, कर्मचाऱ्यांची रिक्त जागा अद्याप भरली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जुनी इमारत ही पावसाळ्यात गळत असल्याने मध्यंतरी लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती. तसेच निवास्थानात अपुऱ्या मूलभूत सुविधांमुळे कर्मचारी मुख्यालयी रहात नव्हते. याची दखल घेण्यात येऊन याठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेने आता मुख्य इमारत व कर्मचारी निवास्थानाच्या बांधकामासाठी शासनाने सहा कोटी २२ लाख रुपये मंजूर केले असून, या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
NCP MLA Disqualification | पुतण्याने बाजी मारली; अजित दादांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम