Deola | महसूल विभागाच्या नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रक्रियेस स्थगिती

0
23
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | महसूल विभागाच्या नव्या वाळू धोरणानुसार लिलाव झालेल्या प्रक्रिया पार पडत होती. ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांना या प्रक्रियेस स्थगिती मिळावी. यासाठी आ. डॉ. राहुल आहेर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर व खामखेडा, भाऊर, सावकी, विठेवाडी, लोहणेर येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बुधवार (दि. २४) रोजी भेट घेत हि प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत महसूल मंत्र्यांनी या गावातील वाळू लिलावास स्थगिती दिल्याचे आश्वासन दिले.

राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने वाळू, रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर केले होते. महसूल विभागाच्या या नव्या वाळू धोरणानुसार खामखेडा,भऊर, सावकी, विठेवाडी, लोहणेर आदि गावातील वाळू लिलाव करण्यात आला होता. या धोरणास या गावामध्ये प्रखर विरोध देखील करण्यात आला.(Deola)

Deola | जाणीव पतसंस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

गावागावात प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी विशेष ग्रामसभांमधून ग्रामस्थांचे म्हणणे एकूण घेतले. या सर्वच गावांमध्ये या वाळू लिलावाच्या धोरणास विरोध होऊनही प्रशासनाकडून गिरणा नदी पत्रातील या गावांमध्ये नव्या धोरणानुसार वाळू लिलावाची प्रक्रिया राबवण्याचे धोरण सुरूच ठेवल्याने आज ग्रामस्थांनी आ. डॉ. राहुल आहेर व केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली या धोरणास विरोध करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत हि प्रक्रिया रद्द करण्याची विनंती केली.

या गावामध्ये वाळू लिलाव झाल्यास या गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी तसेच लोहणेर गावाच्या नदी पत्रात असणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा होणाऱ्या सटाणा, देवळा या मोठ्या शहरांच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीदेखील कोरड्या ठाक पडून बंद पडतील व या शहरांच्या पाणी प्रश्न उग्र बनेल. तरी या गावांमधील वाळू लिलाव प्रक्रिया स्थगित करावी अशी विनंती केली. या गावातील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत महसूल मंत्र्यांनी लगेचच या वाळू लिलावास स्थगिती देण्याचे आदेश निघतील असे आश्वासन दिले. महसूल मंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिल्याने ग्रामस्थांनी आ. डॉ. राहुल आहेर व केदा आहेर यांनी केलेल्या आभार मानलेत.(Deola)

Deola | देवळा येथील आहेर महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा

यावेळी खामखेडाचे सरपंच वैभव पवार, उपसरपंच श्रावण बोरसे, गणेश शेवाळे, अनुप शेवाळे, सुनिल शेवाळे, सचिन शेवाळे श्रावण शेवाळे, सावकीचे ग्रामस्थ अनिल शिवले, जिभाऊनिकम, बापू बोरसे, धनंजय बोरसे, किरण निकम, बबलू पवार, भऊरचे ग्रामस्थ संजय पवार, ग्रा. सदस्य काशिनाथ पवार, सुभाष पवार, नितीन पवार, गंगाधर पवार, योगेश पवार, लक्ष्मण पवार, विठेवाडीचे विलास निकम, शशिकांत निकम, विठोबा सोनवणे, लोहणेरचे माजी सरपंच सतीष देशमुख, दीपक बच्छाव, सोपान सोनवणे, यांसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.(Deola)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here