सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील संगमेश्वर महादेव मंदिराचा द्वितीय वर्धापन व महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (दि. २ मार्च) ते (दि. ८ मार्च) या कालावधीत रोज रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत ह.भ.प मनोजजी महाराज राजपूत, (येणगावकर) यांचे संगीतमय शिवअंश आधारित महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तर, (दि. ९ मार्च) रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान काल्याचे कीर्तन होऊन उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप व कार्यक्रमाची सांगता केली जाईल. तरी याचा देवळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम