Deola | खर्डे परिसरातील वार्षि येथे उद्या शनिवारी (दि. १२) रोजी हनुमान जयंती निमित्त दुर्गा माता यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी (दि. १५) रोजी दुपारी तीन वाजता भव्य कुस्त्यांची दंगल होणार असून, अंतिम कुस्तीसाठी ११ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. अशी माहिती एथिल यात्रा कमिटीने दिली. शनिवारी (दि. १२) रोजी सकाळी देवी व हनुमानाची पूजा करून मिरवणूक काढण्यात येईल. यानंतर महाप्रसादाचे वाटप सोमवारी (दि. १४) रोजी रात्री १० वाजता लोकनाट्य तमाशा, मंगळवारी (दि. १५) रोजी दिवसभर यात्रा व दुपारी ३ वाजता भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असून, यात मनाची अंतिम कुस्ती साठी ११ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम