Deola | देवळा तालुक्यात पीकांना अवकाळी पावसाचा फटका; विठेवाडीत वीज कोसळली

0
23
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह डाळींब, द्राक्ष आदी फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. विठेवाडी (ता. देवळा) येथील भगवंत बाजीराव निकम यांच्या शेतातील नींबाच्या झाडांवर विज कोसळली. घरापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गुरुवारी (दि. ३) रोजी देवळा तालुक्यात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बहुतांश गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.
या पावसामुळे काढणीला आलेल्या उन्हाळी कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Deola | तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शेत रस्त्यांसंदर्भात बैठक संपन्न

त्याच बरोबर डाळींबासह इतर फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या देवळा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. त्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अधून मधून येणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे शेतकऱ्यांची पुरती तारांबळ उडाली आहे. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर हिरावून जात असताना पाहून शेतकरी मोटाकुटीस आला असून, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

“सुलतानी संकटात सापडलेल्या बळीराजाला यावर्षी अस्मानी संकटाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. काढणीला आलेला कांदा, गहू, आंबा या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचणामे करुन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी.”

– (कुबेर जाधव, समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here