Deola | नाशिक जिल्हा तालीम संघाच्या सचिवपदी लक्ष्मीकांत पाटील यांची निवड

0
18
Deola

देवळा : जिल्हा तालीम संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देवळा तालुका तालीम संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांची सचिवपदी निवड झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. गोरखनाथ बलकवडे यांची तर महासचिव म्हणून उत्तम दळवी यांची निवड करण्यात आली. देवळा तालुक्यातून या जिल्हा कमिटीवर पैलवान सुभाष देवरे यांना घेण्यात आले. मतदान अधिकारी म्हणून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे प्रांतिक सदस्य प्रा. रविंद्र मोरे यांनी काम पाहिले. तालीम संघाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील पैलवानांचा उत्साह वाढवणे व तसे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे नवनियुक्त सचिव लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here