Deola | विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी खरे योगदान आई वडिलांचे – मुख्याध्यापक धिवरे

0
22
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी खरे योगदान आई वडिलांचे असून, त्यांच्या प्रेरणेने अनेकांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाच्या त्यांच्या जडणघडणीत प्रेरणा, आत्मीयता व संकल्पनेतून स्वामी विवेकानंदसारख्या महापुरुषांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान लाभले आहे. आपल्या आई वडिलांची आपल्याबद्दलची आत्मीयता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ध्येय बाळगणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जोरण विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय धिवरे यांनी केले.

खर्डे (ता देवळा) येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि. १०) रोजी वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण श्री. धिवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सरपंच जीभाऊ मोहन, उपसरपंच सुनील जाधव, स्कुल कमिटीचे अध्यक्ष राहुल देवरे, उपाध्यक्ष हेमराज सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर देवरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शशिकांत ठाकरे, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, माधव ठोंबरे,

सुरेश जाधव, कारभारी जाधव, पोलीस पाटील भरत जगताप, गोविंदा सोनवणे, भाऊसाहेब मोरे, भानुदास जगताप, शशिकांत पवार आदींसह प्राध्यापक संजय आहेर, श्रीमती एच.एन सोनवणे, उपशिक्षक आर.एन आहिरे, एस.के बागुल, पी.ए देवरे, पी.के दळवी, श्रीमती आर.एम पवार, एम.बी जाधव, श्रीमती व्ही.एम पाटील, एस.के आहिरे, के.व्ही क्षेत्रीय तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य दिलीप रणधीर यांनी केले तर आभार कैलास चौरे यांनी मानले. दरम्यान, खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यालयासाठी ऑटोमॅटिक सॅनिटरी नॅपकीन मशिन भेट दिले. याबद्दल प्राचार्य दिलीप रणधीर यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here