Deola | खर्डे येथे भरदिवसा बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
13
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे (ता. देवळा) येथे बुधवारी दि.26 रोजी भरदिवसा गव्हाच्या शेतात बिबट्या शिरला. यामुळे शेतालगत जमलेल्या नागरिकांचा आवाज ऐकून बिबट्याने याठिकाणाहून धूम ठोकली. येथे बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने याची दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. खर्डे येथे कांद्या पाठोपाठ गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. त्यात बिबट्याचे वारंवार दर्शन घडत असल्याने शेतकरी रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी धजावत नाही.

Deola | देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या व्हा. चेअरमन पदी रवींद्र जाधव

बुधवारी दि. 26 रोजी याठिकाणी शेतकरी निंबा देवरे यांच्या गव्हाच्या शेतात भर दिवसा बिबट्या शिरल्याने घबराट पसरली. यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी या शेताजवळ गर्दी केली. काही जण याला घाबरून बांधावरील झाडांवर चढले. जमलेल्या लोकांच्या गर्दीच्या आवाजात गव्हाच्या शेतातून बिबट्याने धूम ठोकली. याला घटनेमुळे नागरिकांमध्ये बिबतींची दाजसहत पसरली असून पशुपालक तसेच शेतात वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने याची दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here