सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार गठीत करण्यात आलेल्या गाव समितीच्या माध्यमातून खर्डे येथील गेल्या २२ वर्षांपासून प्रलंबित असललेला रस्ता आज शुक्रवारी (दि.२१) रोजी मंडळ अधिकारी के.टी ठाकरे यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आल्याने स्थानिक शेतकऱ्यांची जाण्यायेण्याची समस्या मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, खर्डे (ता. देवळा) येथील बिलओहोळ नाला ते ब्राह्मणआंबा परिसरातील शेतकऱ्यांना याठिकाणी असलेल्या नाल्यात गेल्या २२ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पाझर तलावामुळे जाण्यायेण्याची समस्या निर्माण झाली होती. आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी रस्ता खुला करण्याकामी अडथळा आणल्याने जवळपास वीस ते पंचवीस लोकांना पावसाळ्यात आपला शेतमाल ने आन करताना तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जातांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती.
Deola | विंचूर – प्रकाशा महामार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त; पोलिस बंदोबस्तात काम सुरू
दरम्यान, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण व बंद झालेले शिवरस्ते, गाडी रस्ते, पांदण, शिवार रस्ते, पाय मार्ग मोकळे करण्याकामी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समिती गठीत करण्याचा शासन निर्णयानुसार व जिल्हाधिकऱ्यांच्या परिपत्रकानुसार समजोता घडून आणून त्यानुसार आज शुक्रवारी दि.२१ रोजी मंडळ अधिकारी के. टी ठाकरे यांच्या व गावकऱ्यांच्या उपस्थितीत सदर रस्ता खुला करण्यात आल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी माजी उपसरपंच राहुल देवरे, विजय जगताप, भाऊसाहेब देवरे, पंडित देवरे, अशोक आहेर, दिनेश जगताप, परशराम पवार, बाबुराब देवरे, निंबा देवरे आदी शेतकरी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम