Deola | विंचूर – प्रकाशा महामार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त; पोलिस बंदोबस्तात काम सुरू

0
2
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विंचूर – प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ जी मार्गावरील भावडघाट ते रामेश्वरफाटा व रामेश्वरफाटा ते गुंजाळनगर या रस्त्याचे दीड वर्षांपासून रखडलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर अतिरिक्त पोलिस बंदोबस्तात शुक्रवार (दि.२१) रोजी सुरुवात करण्यात आल्याने अखेर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या महामार्गाच्या अर्धवट कामामुळे वाहनधारक व व्यावसायिक गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त झाले होते. अर्धवट कामामुळे सतत छोटे – मोठे अपघात घडत असल्याने महामार्गाचे तात्काळ काम पूर्ण व्हावे यासाठी वारंवार मागणी होत होती.

संबधित शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाबाबत संभ्रम दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधीसह राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी व भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांनी बांधावर जाऊन हद्द खुणा निश्चित केल्या असून, काही भुधारक शेतकऱ्यांचा संभ्रम कायम असल्याने शेवटी नाशिक येथून अतिरिक्त पोलिस बंदोबस्तात गुंजाळनगर ते रामेश्वर फाटा या दीड किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रखडलेल्या कामाला शुक्रवारी युद्धपातळीवर सुरुवात झाली. आता यापुढे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Deola | देवळा-भावडबारी राज्यमार्गाचे काम दीड वर्षांपासून रखडलेलेच; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

भावडघाट ते रामेश्वर फाटा दुसऱ्या बाजूचे २.४ किमी रखडलेले काँक्रीटीकरणाचे काम देखील लवकरच होणार असून रखडलेले भावडघाट ते गुंजाळनगर रस्त्याचे काम महिनाभरात पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर देवळा शहरातील कामाला सुरुवात होणार असल्याचे संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे भावडबारी घाट कटिंगचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असून मशीनरीच्या सहाय्याने दगड फोडुन काढत लगेचच तेथील मलबा इतरत्र हलवला जात आहे. वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये या पद्धतीने काम सुरू असल्याने लवकरच रस्ता रुंदीकरण होऊन काँक्रीटीकरणाचे काम मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी गाजावाजा करत सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ चे काम हे कधी पाणी टंचाई तर कधी स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींना उचित मोबदला अदा न केल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन काम या पावसाळ्यापूर्वी पुर्ण होणे गरजेचे आहे.

– कुबेर जाधव (समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक) 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here