सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | लोकसहभागातून भूजल योजने अंतर्गत ग्रामस्थरावरील लाभधारक प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी यशदा पुणे व आयुक्तालय भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे व मित्रा नाशिक, वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालय यांचे मार्फत गाव पातळीवर तालुक्यात प्रशिक्षण घेण्यात येत असून, या अनुषंगाने देवळा तालुक्यातील खर्डे, शेरी येथे गावांत यशदाचे मास्टर प्रशिक्षक स्मिता बहादुरे, सरला सोनवणे यांनी उपस्थित ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले. यात शेतीसाठी व घरगुती वापरासाठी पाणी बचतीचे तंत्रज्ञान आणि उपाययोजना, लोकसहभागातून जल अंदाजपत्रकावर आधारित जल सुरक्षा आराखडा, शेतकरी उत्पादक कंपनी शेतमाल उत्पादन आणि बाजारपेठेची जोडणी, जलसंधारण व भूजल पुनर्भरण उपाययोजनांची देखभाल व दुरुस्ती,
Deola | देवळा येथे चोरीच्या घटनांत वाढ; भरदिवसा महिलेच्या पिशवीतून रोख रक्कम लंपास
नैसर्गिक शेती आणि हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञानाचा परिचय आदी विषयावर गाव पातळीवर प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणात खर्डेचे सरपंच अर्जुन मोहन, उपसरपंच भाग्यश्री पवार, माजी उपसरपंच राहुल देवरे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा आहिरे, साखरबाई माळी, अनिता माळी, पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक सोळसे, राहुल मोरे, शशिकांत जाधव, राहुल बागुल, दिनेश पवार, अंगणवाडी सेविका कल्पना गवारे, अरुणा थोरात, अलकाबाई जाधव, आशा सेविका ताराबाई निर्भवने, कविता देवरे, मनीषा आहिरे, वनिता खैरणार, एमएसआरएम गटाच्या सीआरपी व महिला शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम