सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यात खत विक्रेते शेतकऱ्यांना रासायनिक खते देताना लिंकेज खते घेण्याची अट घालत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, यापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला या मागणीचे निवेदन देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांनी खासदार भास्कर भगरे यांना दिले. सदर निवेदनाचा आशय असा की, रासायनिक खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, त्यात विक्रेते शेतकऱ्यांना रासायनिक खते घेताना त्याबरोबर लिंकेज खते घेण्याची अट घालतात. यामुळे शेतकरी मोटाकुटीस आला आहे.
तालुक्यातील रासायनिक खतांची देखील टंचाई निर्माण झाली आहे. वेळेवर खत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, त्यात बळजबरीने लिंकेज खते घेण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली गेल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याची केंद्र सरकारने दखल घेऊन रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत तसेच लिंकेज खतांची अट शिथिल करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Deola | देवळा-भावडबारी राज्यमार्गाचे काम दीड वर्षांपासून रखडलेलेच; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
अन्यथा केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनाला इशारा दिला आहे. यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागेल. याप्रसंगी खासदार भास्कर भगरे यांनी याची दखल घेत शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध करुन देण्याकामी तसेच दुकानदारांकडून लिंकेज खते घेण्यासाठी होत असलेली अट कमी करण्यासाठी कृषी मंत्र्यांना भेटून मागणी करणार असल्याचे सांगितले. यावेळी सभापती बाजार समितीचे योगेश आहेर, नगरसेवक संतोष शिंदे, दिलीप आहेर, सचिन सूर्यवंशी, डॉ. किरण आहेर, संदीप ठुबे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम