Deola | गिरणा नदीवर विठेवाडी सावकी येथील के.टी. वेअरचे काम प्रगती पथावर

0
6
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील विठेवाडी येथील गिरणा नदी पात्रातील स्थानिक जनतेच्या मागणीनुसार परीसरातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या आणि शेतीसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या विठेवाडी सावकी दरम्यान असलेल्या पुलाच्या पश्चिम बाजूला जलसिंचन विभागांतर्गत १८ कोटी रुपये खर्च करून नवीन कोल्हापूर टाइप बंधाऱ्याचे काम जोमाने सुरू आहे. या भरीव कामाचे या परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेलय ह्या के.टी वेअरचे काम मध्यंतरी पाण्याचे आवर्तन आणि पावसाळ्यात पुर पाण्यामुळे सहा सात महिने बंदच होते. मात्र मागील महिन्यात नदी पात्रातील पाणी कमी करुन तळातील पाया भरणीचे काम ठेकेदारांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.

Jilha Parishad | देवळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांचे ‘गुढग्याला बाशिंग’

दोन तीन दिवसांत आवर्तन सोडण्यापूर्वी पायाभरणी (बेड क्रांक्रीट) उरकून वरचे काम करणे सुलभ होईल. येत्या दोन तीन दिवसांत मालेगाव शहरासाठी चणकापुरचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे या कामाचे पाया भरणीचे काम काही दिवसांत युद्धपातळीवर होणे गरजेचे असल्याच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कामावरील साइट इंजिनिअर हीतेश पटेल हे पुर्णवेळ सदरच्या कामावर जातीने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, भविष्यात सावकी विठेवाडी येथील जुन्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्याची दुरुस्ती संदर्भात तसेच आणि सावकी विठेवाडी दरम्यान कारखाना कार्यक्षेत्रातील गिरणा नदी पात्रातील नवीन बंधाऱ्याच्या कामालाही गती देण्यासाठी स्थानिक शेतकरी आग्रही मागणी करत असल्याची माहिती विठेवाडी विकास सोसायटीचे चेअरमन कुबेर जाधव यांनी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here