सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील दहिवड येथील समीक्षा कैलास मोरे हीची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे वतीने तिचा सन्मान करण्यात आला. कु. समीक्षा मोरे हि दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयातील सन २०२० च्या इयत्ता दहावीच्या बॅचची विद्यार्थींनी असून, तिची नुकतीच मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सोमवारी (दि. १०) रोजी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बांधव यांचेकडून शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कु. समीक्षाने ह्या विद्यालयात इयत्ता दहावीत ९२.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला होता. जिद्द, मेहनत व चिकाटीच्या बळावर तिने मानूर येथील प्रेरणा अकॅडमी मधून खडतर मेहनीतीचा प्रवास करून हे धवल यश तिने संपादन केले.
Deola | डॉ. डी. एस. आहेर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा निरोप समारंभ
विशेष बाब म्हणजे सदर अकॅडमी मधून मुलींमध्ये फक्त समीक्षा ही एकमेव मुलगी पाञ ठरली. माणसाच्या अंगी प्रचंड मेहनत घेण्याची व कामात झोकून देण्याची मानसिकता अंगी असली तर यश हमखास मिळते. समीक्षाच्या यशामुळे हे तिने अधोरेखीत करून दाखवले. तिच्या ह्या यशाबद्दल गिरीजा अभियान संस्थेचे मार्गदर्शक केदा आहेर, संस्थेच्या अध्यक्षा धनश्री आहेर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक सुनील शिंदे, शिक्षक मुरलीधर भामरे, विवेक सागर, भरत निकम, किशोर आहेर, विनोद शिंदे, भाग्यश्री पवार, सुरेश आहेर आदींसह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम