सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | डॉ. डी. एस. आहेर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वसाका येथील बीएड पदवी अभ्यासक्रमातील प्रथम आणि द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांनी लोहोणेर येथील जनता विद्यालयात चार महिने छात्रसेवा प्रशिक्षण घेतले. त्याचा नोरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. जनता विद्यालय, लोहणेर येथे दि. ९ डिसेंबर २०२४ ते दि. ८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छात्रसेवकाळ प्रशिक्षणाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. या कालावधीत प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी अध्यापन कौशल्य, अध्यापनासोबत विविध मूल्यांची रुजवणूक, शालेय व्यवस्थापन याविषयी ज्ञान प्राप्त केले.
Deola | अभाविपकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात आहेर महाविद्यालयाचे प्राचार्यांना निवेदन
तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासोबतच विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. छात्रसेवाकाळ प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. गायकवाड, प्रा. मोहन यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक आर. एच. देसले आदींसह सर्व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम