सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे (ता. देवळा) येथील हनी बनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये पाल्यांच्या मातांसाठी मंगळवारी दि. ४ रोजी भव्य हळदी कुंकू सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. या स्कुलच्या प्राचार्या वैशाली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी उपस्थित पाल्यांच्या मातांना वानरुपी गोडवा वाटण्यात आला. या कार्यक्रमाचा मातांनी फुगे फोडणे, बुद्धिमत्ता चाचणी, बादलीत बॉल फेकणे, बाटलीत पाणी भरणे तसेच ऐनवेळी आलेल्या विषयावर बोलणे आदी विविध प्रकारचे खेळ खेळून आनंद लुटला. यावेळी सारिका पवार, पूजा शिंदे, पूजा चव्हाण, वर्षा जगताप, रेणुका गांगुर्डे, सोनाली जाधव, मनीषा ढवळे, सुनिता चव्हाण, योगिता मोरे, अश्विनी गवारे, ललिता देवरे, रश्मी मोरे, सविता देशमाने, वर्षा सोनवणे, माधुरी पगार, अश्विनी देवरे, वैशाली शिंदे, संध्या देवरे, गीतांजली जाधव आदी माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार संचालक किरण जाधव यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम