Deola | नेवासा येथील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नाशिक ग्रामीण संघाचा विजय

0
6
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  स्टेअर फाउंडेशन अंतर्गत नेवासा येथे घेण्यात आलेल्या सतरा वर्ष वयोगटातील मुलांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नाशिक ग्रामीण विरुद्ध वर्धा संघाच्या चूरशीच्या फायनल सामन्यात नाशिक ग्रामीण संघ विजय झाला. या सामन्यात ५० बॉल क्रिकेट संघाने पहिल्याच प्रयत्नात अविश्वासनीय खेळ करत नाशिक ग्रामीण संघाने विजेते पद प्राप्त केले. स्पर्धेत वर्धा संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली होती. यात नाशिक ग्रामीण संघाने ७७ रन केले तर वर्धा संघांने ५३ रन केले. सामनावीर विजय केदारे याने २३ रन केले. यात १४ वर्ष मुलांच्या संघाने देखील तृतीय क्रमांक पटकावला.

Dindori | संस्काराच्या शिदोरीमुळे विद्यार्थ्यांना यश निश्चित – खा. भास्कर भगरे

नाशिक ग्रामीण कर्णधार म्हणून मनीष पवार यांनी वर्धा कर्णधार म्हणून हर्ष महाजन यांनी कामकाज पहिले. यापुढेही असेच खेळाडू देवळा तालुका व नाशिक जिल्ह्यातून घडतील हीच या संघटनेचे ध्येय आहे. विजयी संघाचे संजय (संभाजी) आहेर, संघटनेचे अध्यक्ष योगेश (नानू) आहेर, सचिव प्रा. तुषार देवरे, सदस्य मनोज आहेर, दिलीप गुंजाळ, प्रा. यज्ञेश आहेर, प्रा. किरण भामरे, प्रा. निलेश भालेराव, पराग मोरे, मनीष देवरे, पालक, आजी-माजी खेळाडू यांनी विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here