सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यातील सुभाषनगर येथील भावडी नदीवरील पुलाची भिंत शुक्रवारी (दि.३१) रोजी कोसळली असून, या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र भिंत तुटल्याने पूल कमकुवत झाल्याने परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पुलाच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सुभाषनगर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सुभाषनगर (ता. देवळा) येथील जिल्हा परिषद (इवद) अंतर्गत येणाऱ्या भावडी नदीवरील रस्त्यावर बांधकाम केलेल्या पुलाची भिंत शुक्रवारी (दि. ३१) रोजी पहाटेच्या सुमारास तुटली असून, या पुलाचा कापशी, भिलवाड व मांजरवाडी आदी गावातील नागरिक वापर करीत आहेत.
Deola | इंदिरा गांधी विद्यालयात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान
ह्या पुलाचे गेल्या पाच सहा पूर्वी बांधकाम केलेले आहे. सदर पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्यानेच त्याची एका बाजूकडील भिंत तुटली गेल्याचा आरोप येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. सदर पुलावरून अवजड वाहतूकीसह स्कूल तसेच एसटी बस आदी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सदर पूलाची भिंत कोसळल्याने या परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय झाली असून, संबंधित विभागाने या कामाची त्वरित चौकशी करून तात्काळ योग्य ती कारवाई करावी, तसेच या पुलाची दुरुस्ती किंवा नवीन पूल बांधून परिसरातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेवटी सुभाष नगर ग्रामपंचायतीने केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम