सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे (ता. देवळा) येथील विधायक कार्य समिती संचलित इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शनिवारी (दि. १) रोजी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर देवरे होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
Deola | धर्मनाथ बीज निमित्त विखाऱ्या पहाड येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच जिभाऊ मोहन, माजी उपसरपंच सुनिल जाधव, राहुल देवरे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा अहिरे, हेमराज सोनवणे, संदीप पवार, पत्रकार सोमनाथ जगताप, शशिकांत पवार, हर्षद मोरे, समाधान देवरे, गोविंदा सोनवणे, रामदास गवारे, पंकज पवार, अशोक सोळसे आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने आयोजित क्रीडा, वक्तृत्व, चित्रकला, नृत्य, गायन आदी स्पर्धेत भाग घेऊन तालुका, जिल्हा पातळीवर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्राचार्य संजय आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन शिक्षक चौरे यांनी केले तर आभार आबा आढावा यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम