सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | गोदाभूषण पुरस्कार समितीतर्फे मिळणारा सन्मान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन विद्या प्रसारक समिती निंबोळ्याचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले. निंबोळा येथील रामरावजी अधिक माध्यमिक विद्यालयात गोदा भूषण पुरस्कार समितीतर्फे झालेल्या पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. निंबोळा (ता. देवळा) येथील गोदा भूषण पुरस्कार समितीतर्फे दरवर्षी निंबोळा येथील माध्यमिक विद्यालयात शालांत परीक्षेत यश मिळवणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा व एका शिक्षकाला गोदा भूषण शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
Deola | पिंपळगाव (वाखारी) विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पुरस्कार समितीचे हे सतरावे वर्ष असून २०२४ यासाठी शाळेतील आदर्श सेवक समाधान नारायण सपकाळ यांना व विद्यार्थ्यांमध्ये तनुजा निकम, तेजल अहिरे, चेतना अहिरे, समीक्षा गरुड, दिव्या निकम, वैष्णवी अहिरे, जान्हवी निकम यांना कै. गोदाबाई दशरथ पवार यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा गोदाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दिलीप पाटील, अभिमन पवार, अरुण पवार, पवन पवार, सुनील निकम, धर्माजी निकम देविदास निकम, रोहीत पवार, समाधान निकम, अरुण पगार, मुख्याध्यापक गणेश पाटील, प्रा. स्वामी पवार, कैलास निकम, एस.डी. ठाकरे, एस.व्ही.नेरकर, साधना निकम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन के एच निकम यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम