सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | अयोध्या येथील श्रीरामाच्या मूर्ती प्रती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे औचित्य साधून एस.के.डी. चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित, एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज भावडे (ता. देवळा) येथे संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे यांच्या हस्ते वस्तीगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात गेल्या दहा वर्षात केलेल्या प्रगतीमुळे शाळेच्या हल्लीच्या वस्तीगृहाच्या इमारतीत ५०० विद्यार्थी असून, आज सदर इमारत विद्यार्थी निवासासाठी कमी पडत असल्याने, भविष्यातील संस्थेचा विस्तार लक्षात घेता शालेय आवारातच एक लाख बारा हजार चौरस फुटाच्या आठ मजली इमारतीत बाराशे विद्यार्थ्यांची निवासी उत्तम सुविधा असलेल्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले.(Deola)
Deola | जाणीव पतसंस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
पुढील दहा वर्षात पालकांच्या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचा संस्थेचा मानस आहे. असे यावेळी अध्यक्ष संजय देवरे यांनी सांगितले. तसेच शालेय आवारात २५ मीटर २२ मीटर सेमी ओलंपिक दर्जाचा जलतरण तलाव, सुसज्ज स्पोर्ट हॉल, व्ही. के.डी इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज साठी स्वतंत्र इमारत उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त कसमादे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या दहा एकराच्या जागेवरील कामे प्रगतीपथावर आहेत.
याप्रसंगी संस्थेच्या सचिव मीना देवरे, भूषण पगार, एस.के.डी. स्कूलचे प्राचार्य एस.एन.पाटील, व्ही.के.डी स्कूलचे प्राचार्य एन.के. वाघ, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख शोभा जाधव, शिक्षकेतर कर्मचारी सागर कैलास, बबलू देवरे, मंगेश शिंदे, हेमंत शिंदे, विजय देवरे आदींसह सर्व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम