सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | राज्य क्रीडा दिनानिमित्त देवळा येथील जि.प चे क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक सुनील देवरे यांना जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित आॅलिंपिक विर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्म दिन “राज्य क्रीडा दिन” कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीचा गौरव म्हणून के.टी.एच.एम. काॅलेज सभागृहात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते क्रीडा मार्गदर्शक सुनिल देवरे यांचा सन्मान करण्यात आला.
Deola | मेशी येथे तणनाशकामुळे १०० एकर कांद्याचे नुकसान; आ. आहेरांकडून पाहणी
या कार्यक्रमास क्रीडा संचालक स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अर्जुन पुरस्कार प्राप्त आॅलिंपियन कविता राऊत, मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, साहेबराव पाटील, नरेंद्र छाजेड, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण, भाऊ खरे तसेच आॅलिंपिक, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, महेश पाटील, चित्रा उदार, अरविंद खांडेकर, मिनाक्षी गवळी आदींनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम