सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्वनिधीतून शेतमाल लिलीव बाजार शेडचे भूमिपूजन माजी सभापती केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. देवळा बाजार समितीमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली असून, कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना रोख पेमेंट दिले जात आहे. बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेता बाजार समितीच्या वतीने नवीन लिलाव शेडची उभारणी करण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन बुधवारी (दि.1) रोजी माजी सभापती केदा नाना आहेर, यांच्या हस्ते करण्यात आले. या कामाचे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रसंगी सभापती योगेश आबा आहेर संचालक भाऊसाहेब पगार, विजय सोनवणे, शिवाजीराव पवार, निंबा धामणे, योगेश गुंजाळ, जगदीश पवार, भास्कर माळी, रमेश महाजन, दिलीप पाटील, दिपक पवार, अभिजीत निकम, भावराव नवले, सचिव माणिक निकम, आर्कि. स्वप्नील सावंत, अनिल पगार आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम