सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा हे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन ‘मविप्रचे ‘ तालुका संचालक विजय पगार यांनी केले. मविप्र संचलित देवळा येथील आदर्श शिशुविहार, अभिनव बाल विकास मंदिर व जनता विद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमांप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘मविप्र’चे नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे, सेवक संचालक सी.डी.शिंदे, शालेय समिती अध्यक्ष प्रदीप आबा आहेर, सदस्य हिरामण गांगुर्डे, कारभारी आहेर, दिलीप पाटील, गोविंद पगार मुख्याध्यापक मनीष बोरसे आदि मान्यवर उपस्थित होते. शिक्षिका पुनम पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.
Deola | आ. सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून देवळा तालुक्यातील शाळांना संगणक वाटप
यावेळी उपस्थित मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने शाल व गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक मनीष बोरसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मविप्र’चे सेवक संचालक सी.डी.शिंदे होते. अध्यक्षीय मनोगतातून शिंदे यांनी संस्था राबवित असलेल्या उपक्रमांचा दाखला देत स्नेह संमेलनाचे महत्त्व विषद केले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली. यात लहान गट ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी समूहनृत्य, नाटक,समूहगीत सादर करत उपस्थित पाहुणे व उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर आहेर, सुरेश आहेर, पुनम पाटील, शैला भामरे, रोहिणी देवरे, शुभांगी देवरे, वृषाली देवरे, राकेश बिरारी आदि शिक्षकांनी केले. आभार सुरेश आहेर यांनी मानले. तंत्र सहाय्यक म्हणून विनोद शेवाळे, उमेश अहिरे यांनी कामकाज केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम