सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे (ता. देवळा) येथे शुक्रवारी (दि. २) रोजी अवैद्य गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या देवळा पोलिसांनी उद्धवस्थ केल्या. (दि. २६) जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत गांवातील अवैद्य गावठी दारू विक्री बंद करण्यात यावी, असा एकमुखी ठराव झाला आहे. त्या पार्श्ववभूमीवर येथे देवळा पोलीसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डे उद्धवस्थ केल्याने सर्रास उघड्यावर गावठी दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. खर्डे (ता. देवळा) येथे मोठ्या प्रमाणावर अवैद्य गावठी दारू तयार होत असून, अनेक तरुणांचा स्वस्तात मिळणाऱ्या दारू पिण्याकडे कडे कल दिसून येत असल्याने या व्यसनापी अनेकांचे संसार देखील उद्धवस्थ झाले आहेत.
Deola | देवळा रोटरी क्लब च्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना सायकली वाटप
तर नियमित या सेवन करणारे तळीराम मृत्युमुखी पडली आहेत. हि दारू कायमस्वरूपी बंद करण्यात यावी,अशी मागणी महिला वर्गाकडून वारंवार केली जात आहे. याठिकाणी अनेकदा तात्पुरती कारवाई पलीकडे ठोस निर्णय होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून, नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत परत गावठी दारू बंद करण्याचा निर्णय झाला असून, देखील सर्सास पणे हा व्यवसाय सुरु असल्याने निर्णय फक्त कागदोपत्रीच झाला का ? असा प्रश्न उपस्थित झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, स्थानिक पोलीस पाटील व पोलीस मित्र यांच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. २) रोजी देवळा पोलिसांनी याठिकाणी छापा मारून अवैद्य गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्या उद्धवस्थ केल्याने खळबळ उडाली असून, या कारवाईने व्यावसायिकांचे व तळीरामांचे पुरते धाबे दणाणली आहेत. हि कारवाई अशीच सुरु ठेवावी अशी मागणी महिला वर्गाने केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम