सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | विठेवाडी ता. देवळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै. शरद जोशी यांची नववी पुण्यतिथी साजरा करण्यात आली. यावेळी कै. शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते. कै.शरद जोशी यांच्या शेतकरी चळवळीतील योगदानाविषयी त्यांनी सुरू केलेल्या विविध आंदोलनांची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी आपल्या श्रद्धांजली भाषणात दिली.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणीक निकम, शेतकरी संघटनेचे नेते फुला आप्पा जाधव, विठेवाडी वि. का सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोनवणे, दिपक निकम, पि.डी निकम, कैलास कोकरे, भास्करराव निकम, विठोबा सोनवणे, ईश्वर निकम, शशी निकम, वसंतराव निकम, मिलिंद निकम, शिवा निकम, रावसाहेब निकम, भास्कर निकम, रमेश निकम, शंकु निकम, संजय निकम, श्रावण निकम, काशिनाथ बोरसे, सुभाष पगार, दिपक पवार आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम