सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष पदी महाल पाटणे येथील तेजस आहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी (दि.१२) रोजी देवळा येथे सुराणा पतसंस्थेच्या हॉलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत युवक तालुका अध्यक्ष पदी तेजस आहिरे याची निवड करण्यात येऊन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार म्हणाले की, “जिल्हात पक्षाची प्रतिकूल परिस्थिती असतांना देखील विधानसभा निवडणुकीत सातही उमेदवार निवडून आले. यामुळे पक्ष जिल्ह्यात नंबर एकवर पोहचला आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले, लाडकी बहीण आदी योजना अंमलात आणल्याने आपल्याकडे लाडके भाऊ म्हणून बघू लागले. याचा सर्वत्र परिपाक बघता पक्षासाठी चांगले चित्र निर्माण झाले आहे. पक्ष वाढीसाठी युवकांची गरज महत्त्वाची असून, युवकांची संघटना देखील आक्रमक पाहिजे दुबळी नको. जिल्ह्यात युवकांची संघटना चांगली कामगिरी करीत असून, पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. युवकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असून, काम करत रहा पद मिळत राहतील व जिल्हा परिषद गट निहाय मेळावे घेऊन पक्षाची ताकद वाढवा. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत युवकांना संधी दिली जाईल, असे यावेळी अॅड. पगार यांनी सांगितले.
Deola | आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेत आहेर महाविद्यालयाची बाजी
यावेळी प्रांतिक सदस्य योगेश आबा आहेर, ज्ञानेश्वर आहिरे, नितीन गांगुर्डे, प्रसाद दळवी, चेतन कासव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास नगरसेवक संतोष शिंदे, रोहित पाटील, नितीन गांगुर्डे, मनोज गुजरे, वैभव पवार, दत्तू आहेर, स्वप्नील आहेर, सुजित सोनवणे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात बंडू आहेर, गणेश आहेर, सतीश सूर्यवंशी आदींनी पक्ष प्रवेश केला. प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस जगदीश पवार यांनी केले तर प्रा. बापू रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम