सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन (मुले व मुली) या स्पर्धेत कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या संघाने बाजी मारली असून, अजिंक्यपद पटकावले आहे. या स्पर्धा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मंगळवारी (दि.१०) रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेसाठी नाशिक विभागाचे सचिव डॉ.नरेंद्र निकम, सहसचिव डॉ. मनीष देवरे,
प्रा. संतोष जाधव आदी उपस्थित होते. एकूण बारा संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
Deola | कर्मराव रामरावजी आहेर महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा
मुलांचा अंतिम सामना देवळा महाविद्यालय विरुद्ध मालेगाव कॅम्पचे म.स.गा महाविद्यालय यांच्यात झाला. यात देवळा महाविद्यालयाने विजय मिळवला. तसेच मुलींच्या अंतिम सामन्यात देवळा महाविद्यालय विरुद्ध सटाणा महाविद्यालय यांच्यात होऊन देवळा महाविद्यालयाने विजय मिळवला. स्पर्धेसाठी पंच म्हणून दिलीप गुंजाळ, यज्ञेश आहेर, प्रशांत जाधव, तुषार पगार यांनी काम पाहिले. विजयी खेळाडूंचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर देवळा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. मालती आहेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे.आर.भदाणे, डॉ. डी.के.आहेर, क्रीडा संचालक प्रा. प्रमोद ठाकरे, प्रा. किरण भामरे, प्रा. तुषार देवरे यांनी अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम