सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील कर्मराव रामरावजी आहेर महाविद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. देवळा येथील कर्मराव रामरावजी आहेर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व देवळा पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी एस.आर भामरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य आर.एन निकम होते. यावेळी देवळा पंचायत समितीच्या वतीने पल्लवी भामरे यांनी दिव्यांगांच्या विविध समस्यांवर उपाययोजना शासन स्तरावर सोडविल्या जात असून, विविध योजना लाभ दिव्यांगांना देण्यात येत आहेत. यासाठी राज्यात भारतातील पाहिले दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना देखील करण्यात आली आहे. याचा लाभ घ्यावा. यावेळी शिक्षण विशेष तज्ञ संदीप जाधव, संदीप पाटोळे, श्रीम. प्रियांका पगार, सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. आभार श्रीम.एन.वाय पाटील यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम