Deola | सरकारच्या दडपशाहीविरुद्ध देवळ्यात राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

0
17
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  ईडी सीबीआयद्वारे विरोधकांवर दडपशाही करणाऱ्या राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वतीने तहसीलदार विजय सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांना गुरुवारी ( दि.१) रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, सध्याचे राज्य व केंद्र सरकार हे ईडी व सीबीआयच्या नावाखाली लोकशाही दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.

देशात लोकशाही असून राज्यातील व केंद्रातील सरकार महागाई, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, शेती मालाची दुरावस्था हे सगळे मूळ मुद्दे बाजूला सारून अनावश्यक बाबींवर प्रभाव टाकून लोकशाही दडपण्याकरता महाराष्ट्रातील उत्तम काम करणाऱ्या नेत्यांची व लोकप्रतिनिधी यांच्याविरुद्ध ईडी व सीबीआयच्या नावाखाली तोंडदाबनी करून लोकशाही दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यकर्त्यांनी हे समजून घ्यावे. मुंबई आज पर्यंत कधी थांबली नव्हती, एक मराठा योद्धा मनोज जरांगे हे राज्याचे मंत्रिमंडळ व मुंबई थांबवू शकतात. तर जनता काय करु शकते हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेवून जनतेच्या हिताची कामे करावी असा इशारा या निवेदनातुन देण्यात आला आहे.

Deola | मराठा आरक्षणाच्या मसुद्याविरोधात महात्मा फुले समता परिषद देवळ्याची हरकत

यावेळी तालुकाध्यक्ष पंडित निकम, जि.प. च्या माजी सभापती उषाताई बच्छाव, नगरसेविका ऐश्वर्या आहेर, जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, डॉ. संजय निकम, शहर अध्यक्ष दिलीप पाटील, शेतकी संघाचे संचालक रवींद्र जाधव, यश निकम, यशवंत देवरे, मयूर सोनवणे आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here