सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | २६ जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील प्रसिद्ध केलेल्या राजपत्राच्या मसुद्याच्या विरोधात ‘अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद’ देवळा तालुक्याच्या वतीने हरकत घेण्यात आली असून, जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. १) रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.(Deola)
राज्य शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रसिध्द केलेल्या राजपत्राच्या मसुद्याच्या बाबतीत सर्व ओबीसी समाज, भटक्या विमुक्त जातीच्या नागरिकांचा विरोध असून तो विरोध शासनाला कळविण्यात यावा अशी मागणी निवेदनात केलेली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष रमेश अहिरे, महिला अध्यक्ष सरला सोनवणे, वसंत महाजन, समाधान महाजन, जीभाऊ बागुल, योगेश पवार, शेख जाकीर, सुरेश जगदाळे, राकेश बच्छाव, स्वप्निल कोठावदे, संदीप बच्छाव, सुदाम खैरनार, भीमा शेवाळे, प्रभाकर बच्छाव, गोरख शेवाळे, हिरामण अहिरे, अशोक महाजन, संतोष बागुल, गौरव शेवाळे, भाऊसाहेब जगदाळे, आदींसह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.(Deola)
Budget 2024 | बजेटमध्ये महिला आणि शेतकऱ्यांसाठी काय..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम