Deola | गिरणा नदीवरील के.टी वेअरमुळे पाणी प्रश्न मार्गी लागणार – आ. राहुल आहेर

0
48
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  तालुक्यातील गिरणा नदीपात्रावरील प्रस्तावित सावकी – विठेवाडी येथील के.टी वेअरच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून, या भरीव कामामुळे परिसरात सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आज येथे केले.

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचा आज भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, यावेळी आ. आहेर म्हणाले की, गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत असल्याने या नदीवर असलेल्या पाणी पुरवठा करणाऱ्या उध्दभव विहिरी कोरड्या पडतात. तसेच यामुळे परिसरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. याला आळा बसवावा यासाठी सावकी – विठेवाडी येथील ग्रामस्थांनी गिरणा नदीवर के.टी वेअरचे काम करण्यात यावे अशी मागणी केली होती. राज्य सरकारने ह्या कामाला मंजुरी दिली असून, या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.(Deola)

Deola | खुंटेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय भामरे बिनविरोध

यावेळी आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते पाटणे – निंबोळा लोहोणेर विठेवाडी या स्त्याची सुधारणा करणे. (कारखाना ते नेपाळी फाटा), विठेवाडी येथील तलाठी कार्यालय, वसाका ते आदिवासी आश्रमशाळा स्त्याची सुधारणा करणे, विठेवाडी येथे वाचनालयाचे बांधकाम करणे, बाभूळफाटा ते दत्तमंदिर स्त्याची सुधारणा करणे, माळवाडी येथे तलाठी कार्यालय बांधणे, आराई ते वासोळ, खालप – माळवाडी रस्ता (गावांतर्गत काँक्रीटीकरण करणे), माळवाडी गावांतर्गत जोडरस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.(Deola)

वाजगाव येथे वडाळा ते कोलथे शिवार गाढे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे, तलाठी कार्यालय बांधणे, वाजगाव येथे हनुमान मंदिरालगत संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, जि. नाशिक तलाठी कार्यालय, वार्शी येथे तलाठी कार्यालय बांधणे, मुलुखवाडी ते सोनवणे वस्ती रस्त्याची सुधारणा करणे, मुलुखवाडी ते वार्शी रस्ता सुधारणा करणे आदी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी विठोबा सोनवणे, भास्कर निकम, माणिक निकम, कुबेर जाधव, पि.डी. निकम, कैलास निकम, काकाजी निकम, काकाजी आहेर, सुधाकर निकम, शिवाजी निकम, राजु निकम, तानाजी निकम, दिलीप निकम, महेंद्र आहेर, संजय साळवे, तहसीलदार विजय सुर्यवंशी आदी उपस्थित होते.(Deola)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here