सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ उमराणे येथील जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर वही विक्री केंद्राचे उद्घाटन व इ. १०वी व इ. १२वी च्या गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. जाणता राजा मित्र मंडळाच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या ३१ वर्षापासून प्रत्येक क्षेत्रात विविध समाजकल्याणकारी उपक्रम राबवले जातात. यावर्षीही धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून “ना नफा ना तोटा” तत्वावर आधारित वही विक्री केंद्राचे उद्घाटन त्र्यंबक देवरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यानंतर इ. १०वी व इ. १२वी मध्ये विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तेजस्विनी देवरे, स्वराज पवार, तेजस्वी देवरे, ऋतुजा देवरे, पायल देवरे, प्रिती अहिरे, कुणाल बेलदार, भाग्यश्री देवरे, राहुल मोहिते, प्रिया पवार, प्रिया देवरे, रिद्धी गायकवाड, सिद्धी गायकवाड, जय पारख, भुमिका पवार, कल्याणी देवरे यांना सामाजिक कार्यकर्ते संजय ओस्तवाल यांच्या हस्ते ‘शिवचरित्र’ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
Deola | गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्य पदी बाळासाहेब गुंजाळ यांची बिनविरोध निवड
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाळासाहेब देवरे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सरपंच दिलीप देवरे, ग्रा. सदस्य सचिन देवरे, बाजार समिती सदस्य प्रवीण देवरे, वन विभागाचे अधिकारी जि. जि. पवार, केदा देवरे, पंडित देवरे, राजाराम देवरे, साहेबराव देवरे, शांताराम देवरे, दत्तु देवरे, डी. डी. परदेशी, जे. ए. देवरे, डी. एच. पाटील, वाय. जि. कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी प्रास्ताविकात मंडळाचा विविध समाजपयोगी उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून अखंडपणे सुरु असल्याने आजच्या तरुणांना आदर्श निर्माण करण्याचे काम मंडळाच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले.
Deola | देवळा शिवसेनेच्या वतीने चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम