सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा ‘जाणीव ग्रामीण बिगर शेती सहकारी’ पतसंस्थेच्या मंगळवारी (दि. २३ )रोजी वर्धापन दिनानिमित्त संस्था कार्यालयात संचालक अनिल आहेर यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या पतसंस्थेने सभासद, ठेवीदार यांचा विश्वास संपादन केला आहे. तात्काळ कर्ज वाटप, वसुली याकामात सुसूत्रता असल्याने थकबाकीचे प्रमाण नगण्य असून, अल्पावधीत नावारूपास आलेल्या या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक आदींनी भेट देऊन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थापक भाऊसाहेब पगार, संस्थापक चेअरमन जितेंद्र आहेर, व्हा. चेअरमन लक्ष्मीकांत आहेर, मानद कार्यकारीसंचालक नरेंद्र हिरे, समाधान आहेर, सुनील आहेर, यशवन्त आहेर, पंकज सावकार, दावल भदाणे, सुलभा आहेर, भाग्यश्री पवार, वसंत आढाव, विष्णू शेवाळे, व्यवस्थापक दिलीप आहेर, दीपक आहेर, शरद खैरणार, योगेश निकम आदी उपस्थित होते .
वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सभासद, ठेवीदार ,ग्राहक व हितचिंतक आदींनी भेट देऊन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थापक भाऊसाहेब पगार, संस्थापक चेअरमन जितेंद्र आहेर, व्हा. चेअरमन लक्ष्मीकांत आहेर, मानद कार्यकारीसंचालक नरेंद्र हिरे, समाधान आहेर, सुनील आहेर, यशवंत आहेर, पंकज सावकार, दावल भदाणे, सुलभा आहेर, भाग्यश्री पवार, वसंत आढाव, विष्णू शेवाळे, व्यवस्थापक दिलीप आहेर, दीपक आहेर, शरद खैरणार, योगेश निकम आदी उपस्थित होते.(Deola)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम