सोमनाथ जगताप – प्रतिनिधी – देवळा | तालुक्यातील सटवाईवाडी ग्रामपंचायतीच्या उप सरपंच पदी सोनाली विकास आहेर यांची निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच मनीषा प्रवीण वाघ यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नूतन उपसरपंच निवडीसाठी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत आहेर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दि. ११ रोजी दुपारी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यलयात सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते उपसरपंच पदी सोनाली विकास आहेर यांची निवड करण्यात आली. यावेळी सदस्य सर्वश्री विलास भामरे, शांताराम भालेराव, गुलाब पवार, अंजनाबाई सोनवणे, शालिनी चव्हाण, मनीषा वाघ, सोनाली आहेर, मनीषा नवले, प्रदीप आहेर आदींसह ग्रामविकास अधिकारी विजय देवरे उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली आहेर यांची नियुक्ती होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. उपसरपंच आहेर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम