Deola | दाजी पाटील पतसंस्थेला २२ लाखांचा नफा; शंभर टक्के कर्ज वसुली – चेअरमन अशोक आहेर

0
3
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी – देवळा | देवळा येथील दाजी पाटील नागरी सहकारी पतसंस्थेस २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात २२ लाख २३ हजार १०० रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक विजय पाटील आणि अध्यक्ष अशोक संतोष आहेर यांनी दिली. मार्च २०२५ या आर्थिक वर्षाच्या अखेरीस संस्थेकडे सुमारे ६८ लाख रुपये इतके वसुल भागभांडवल जमा आहे. १ कोटी २४ लाख ७९ हजार इतका विविध प्रकारचा निधी आहे. पतसंस्थेची विविध वित्तीय संस्थांमधील गुंतवणूक २ कोटी २१ लाख ४८ हजार रुपये इतकी आहे. मागील वर्षीच्या अखेरपर्यंत पतसंस्थेने २ कोटी ९६ लाख ६४ हजार रुपयांचे कर्जवाटप केलेले असून २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात संस्थेने शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे, अशीही माहिती उभयतांनी दिली. याप्रसंगी उपाध्यक्षा लता आहेर यांच्यासह संचालक सदस्य – बाळासाहेब आहेर, मनोज आहेर, राकेश आहेर, कौतिकराव भामरे, शिवाजी जाधव, अनिता पवार, डॉ किरण आहेर, प्रवीण चंदन आदींसह कर्मचारी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here