सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील पोलीस ऍक्शन मोडवर आले असून तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतूक व उत्खननाबाबत प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सातत्याने अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका पोलिस प्रशासनाने सुरू केला आहे. अवैधपणे वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असून वाळू तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी दिला आहे. देवळा तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतूकी विरुध्द देवळा पोलिस प्रशासनाने मोहिम उघडली आहे. त्या अनुषंगाने सोमवार दि. १० रोजी रात्री वासोळ शिवारात गिरणा नदी पात्रातून वाळूची वाहतूक करणारे जॉन डियर कंपनीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पाठलाग करून पकडण्यात आले.
Deola | खर्डे येथे सुतार लोहार संघटनेच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी
यावेळी ट्रॅक्टर रस्त्यावर सोडून चालक फरार झाला असून ट्रॅक्टर मालक राहुल केदारे यांचे विरुध्द कडक दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे. वाळू चोरीस आळा बसावा म्हणून प्रशासनाकडून भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. सदर पथक दिवसा व रात्री धडक कारवाई करीत आहे. त्यामुळे वाळू माफियांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. यापुढेही अवैध गौणखनिज वाहतुकी विरुध्दची कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी सांगितले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, पोलीस हवालदार भास्कर सोनवणे, इंद्रजित बर्डे, संदीप चौधरी, सुरेश कोरडे, शेख आदींनी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम