सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे (ता. देवळा) येथील अशोक सुखदेव पवार (४५) यांनी रविवारी (दि. ९) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून, या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी कि, देवळा तालुक्यातील खर्डे येथील अशोक सुखदेव पवार (४५) यांनी रविवारी दि. ९ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राहत्या घरात घरी कोणी नसतांना घराच्या आढ्याला दोराच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची मयत पवार यांचे चिरंजीव रोशन पवार (२३) याने देवळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
Deola | देवळा तालुक्यातील समीक्षा मोरे हिची मुंबई पोलीस दलात निवड
मयत अशोक सुखदेव पवार यांनी अज्ञात कारणावरुन त्यांचे राहते घरी दोरीचे सहाय्याने घराच्या आढ्याला फाशी घेतल्याचे पोलीस पंचनाम्यात नमूद करण्यात आले असून, पवार यांच्यावर सोमवारी दि.१० रोजी सकाळी १० वाजता देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात आला. दुपारी ११ वाजेच्या सुमारास खर्डे येथे अशोक पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण,पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भोये करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम