सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | उमराणे येथील भुसार मालाचे व्यापारी अशोक बन्सीलाल कर्नावट यांनी खरेदी केलेल्या मक्याची दोन आरोपींनी परस्पर व्हिलेवाट लावून ६ लाख १७ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, सोमवारी (दि.२३) रोजी रात्री ८ ते बुधवार (दि.२५) रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान आरोपी मोहम्मद शहेनशाह मोहम्मद गुल हसन व मोहम्मद शमीर मोहम्मद नसीम कुशेरी, मशिदखान जुमाई खान सर्व (रा. मवया मिया गाव, दुबई मोहल्ला गल्ली प्रयागराज, उत्तर प्रदेश)
Deola | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या व्यक्तव्याविरोधात देवळा तालुक्यात निषेध मोर्चा
यांनी उमराणे येथील भुसार मालाचे व्यापारी अशोक बन्सीलाल कर्नावट यांनी खरेदी केलेला २५२ क्विंटल मका आजच्या बाजार भावाप्रमाणे किंमत ६ लाख १७ हजार ४०० रुपये किंमतीचा असून, हा मका खारीफाटा, दहिवड रोड, फुलेनगर अशोक मामा वेब्रिज उमराणे ता. देवळा येथून मालट्रक क्रमांक यूपी ७० सी टी ५४६७ यात भरून अहमदाबाद मातरखेडा गुजरात या ठिकाणी न पाठवता अरोपींनी स्वतःच त्याची परस्पर विल्हेवाट लावून व्यापारी कर्नावट यांची फसवणूक केली आहे. या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुजर करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम