Deola | देवळा-खर्डे रस्त्यावर प्रशासकीय कार्यालयाजवळ बुधवारी (दि.१२) रोजी दुपारी एक वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. देवळा पोलिसात या अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी कि, बुधवारी (दि.१२) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास देवळा खर्डे रस्त्यावर देवळ्याच्या दिशेने येत असलेले दुचाकीस्वार पोपट विठोबा खैर (४७) रा. भावडे ता. देवळा यांना समोरून येणाऱ्या अज्ञात दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिली. यात खैर यांना अपघातात जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Deola | न्यायालयाच्या निर्णयानंतर भावडघाट ते गुंजाळनगर रस्त्याचे काम पुन्हा सुरू
देवळा पोलिसांत अज्ञात वाहन धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत पोपट खैर यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन सायंकाळी सहा वाजता भावडे येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. खैर हे सपत्नीक खर्डे येथून आपल्या नातेवाईकाचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असतांना हि दुर्दैवी घटना घडली. यात त्यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम