Deola | देवळा मालेगाव मार्गावरील पेट्रोल पंपावर कामगारास मारहाण करत रोख रक्कम लंपास

0
13
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा मालेगाव या राज्य मार्गावरील पिंपळगाव (वा) येथील एमके पेट्रोल पंपावर सोमवारी (दि. 24) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास तीन जणांनी पंपावरील कामगारास कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून रोख रक्कम 6 हजार 140 रुपयांची जबरी चोरी करून पळ काढल्याची घटना घडली असून, यातील तिन्ही आरोपींविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Deola | देवळ्यातून ताब्यात घेतलेल्या ‘त्या’ महिला बांगलादेशीच

तिन्ही आरोपी ताब्यात  

याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देवळा मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी येथील (इंडियन ऑइलच्या) एमके पेट्रोल पंपावर सोमवारी (दि. 24) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास सचिन बाळु आहिरे, रोशन बाळु आहिरे दोन्ही (रा. दहिवड ता. देवळा) व कुणाल संजय पवार (रा. कणकापुर ता. देवळा) हे बजाज कंपनीची पल्सर विना नंबरची घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर त्यांनी अजय बनवरीलाल यादव (वय 30 ) (रा. सुजनीपुर कत्रोवली ता. राणीगंज जिल्हा प्रतापगढ़ राज्य उत्तरप्रदेश) हल्ली (रा. पिंपळगाव वाखारी) या पंपावरील मजुराला पकडुन खाली पाडले त्याला मारहाण केली व यातील एकाने कोयता काढुन धाक दाखविला. तर, दुसऱ्याने त्या मजुराच्या खिशातुन जबरदस्तीने 6,140 रुपये रोख रक्कम काढुन चोरी करून पळुन गेले अशी फिर्याद मजूर अजय बनवरीलाल यादव याने देवळा पोलीस ठाण्यात दिली. या घटनेची पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी दखल घेत वरील तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बी. एन. सोनवणे आदी करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here