सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | माजी आमदार कै. शांताराम तात्या आहेर देवळा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातर्फे केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत जिल्हा मार्केटिंग मार्फत हमी भावाने मका खरेदी केला जाणार असल्याने मका खरेदी नोंदणी सुरु करण्यात आली असून खरिप हंगामातील पीके मका, बाजरी, ज्वारी उत्पादक शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन संजय गायकवाड, व्हा. चेअरमन सौ. अर्चना आहेर, व्यवस्थापक गोरख आहेर व संचालक मंडळाने केले आहे. संघाच्या वतीने विविध योजनान्वये शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्यात येते.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संघाचे संचालक योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कार्यरत असून संघाच्या देवळा येथील मुख्य कार्यालयात खरिप हंगामातील मका, बाजरी, ज्वारी खरेदी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. मका उत्पादक शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील मका, बाजरी, ज्वारी विक्रीसाठी नोंदणी ऑनलाईन असल्याने नोंदणीसाठी आधार कार्ड, चालू वर्षाचा ऑनलाईन पिकपेरा नमूद असलेला सातबारा उतारा, बँकेचे पासबुक, आदी कागदपत्रे स्कॅन करून (दि.३०) डिसेंबर अखेरपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा असेल व मका, बाजरी, ज्वारी, पीकांची पीक पहाणी लावली असेल त्या शेतकरी बांधवांनी स्वतः उपस्थित राहुन सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम