सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | नारपार योजनेसंदर्भात कसमादेमध्ये विरोधकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नरेटीव्ह पसरवले जात आहेत. याबाबत राज्य शासनाने अगोदरच या योजनेच्या खर्चाची जबाबदारी घेतली असून त्यास राज्यपाल यांची स्वाक्षरी झाल्याची माहिती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. नारपार योजना पूर्णत्वास यावी यासाठी गेल्या ५० वर्षांपासून या प्रकल्पाची मागणी होत होती.
त्यात विशेष करून केमच्या डोंगरावर होणाऱ्या पावसामुळे गुजरात राज्यात पाणी वाहून जात होते. त्याचा फायदा गुजरात राज्यालाही न होता ते पाणी समुद्रात वाहून जात होते. सदरचे पाणी हे महाराष्ट्रातील गिरणा खोऱ्यात वळवावे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले गेले त्यात माजी मंत्री डॉ स्व. दौलतराव आहेर यांनी देखील प्रयत्न केले. परंतु सदरचा प्रकल्प हा केंद्राद्वारे घ्यावा की राज्याने निधी उभारावा यातच गेली अनेक वर्ष तो लाल प्रीतीत अडकून पडल्याने त्यास विलंब झाला व त्याच्या कामाचे मूल्य वाढत गेले.
Deola | वसाका विक्री न करता भाडे करारावर द्यावा; आ. आहेरांसह शिष्टमंडळाची अजित पवारांकडे मागणी
परंतु राज्य शासनाने सदर प्रकल्पावर खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारल्याने त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वतः मान्यता देऊन राज्यपालांकडे पाठविण्यात आले. त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याने हा प्रकल्प आता कोणीही रोखू शकत नाही. त्यात सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव मधील काही भाग यांना सिंचनाचा लाभ होणार आहे. याची निविदा लवकरच निघणार असून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. तरी विरोधकांनी विरोधासाठी लोकसभेप्रमाणेच अफवांच्या माध्यमातून जनता व शेतकऱ्यांची दिशाभूल सुरू केली आहे. याबाबतची वास्तव सत्यता त्यांनी आकडेवारीच्या माध्यमातून सांगितली.
नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याने नाशिक जिल्ह्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने ही जमेची बाजू असून कळवण, देवळा, मालेगावसह जळगाव जिल्ह्याला याचा लाभ होणार आहे. नारपार गिरणा हा प्रकल्प ७ हजार १५ कोटी रुपयांचा असून यात पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाणी वापर प्रस्तावित आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील २५३१८ हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यातील १७ हजार २४ हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार असल्याची माहिती आमदार डॉ.राहुल आहेर यांनी शनिवार (दि.१०) रोजी दिली.
Deola | देवळा येथील युवा संवाद मेळाव्यात युवकांकडून केदा आहेर यांच्या उमेदवारीची मागणी
या योजनेत नऊ नवीन धरणे बांधण्यात येणार असून, एकूण तीनशे पाच मीटर उपसा करून पाणी तापी खोऱ्यातील चणकापूर धरणात आणण्यात येईल. या योजनेला १५ मार्च २०२३ रोजी एस.एल.टी.ए.सी ने मान्यता प्रदान केली होती. २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उपसा सिंचन योजना म्हणून शासकीय खर्चाने हाती घेण्यात आलेल्या या योजनेला मान्यता देण्यात आली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम