सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास अंतर्गत “लोकसंख्या नियंत्रण जनजागृती” यावरील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर १६ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत तालुक्यातील सहस्रलिंग, रामेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन ह.भ.प. पोपट सुकदेव पगार यांनी केले. यावेळी त्यांनी आदर्श व्यक्तिमत्व घडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर महत्वाची भुमिका निभावते असे त्यांनी सांगितले.
मविप्रचे संचालक विजय पगार यांनी विवेकानंदांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे गुण प्रत्येक स्वयंसेवकांनी अंगीकारणे आवश्यक आहे, विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संस्कार निर्माण होण्यासाठी श्रम संस्काराची आवश्यकता असते असे प्रतिपादन केले.
Deola | खुंटेवाडीत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य शोभा यात्रा
प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर यांनी श्रमसंस्कार शिबिरातील स्वयंसेवकांना शुभेच्छा देऊन श्रम मूल्य जपण्याचे आवाहन केले. संस्थेच्या सचिव डॉ. मालती आहेर यांनी विद्यार्थ्यांची जडणघडण चांगल्या रीतीने होण्यासाठी व व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी श्रमसंस्कार शिबिर हे उत्कृष्ट माध्यम आहे. तसेच पुस्तकी ज्ञानाबरोबरच मूल्यशिक्षण घेणे काळाची गरज आहे. सर्वगुण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे व औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या दृष्टीने मुलांवरती संस्कार होणे गरजेचे आहे असे आवाहन केले.
कार्यक्रम आधिकारी डॉ. जयमाला चंद्रात्रे यांनी ७ दिवस चालणाऱ्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्दिष्टे व ध्येय तसेच करावयाची कामे इत्यादीं बद्दल माहिती दिली. शिबिर काळातील वैचारिक प्रबोधनात कार्यक्रम आधिकारी डॉ. राकेश घोडे यांनी नदी जलस्त्रोत स्वच्छता, प्रा. व्ही. डी. काकविपुरे – ऐतिहासिक स्थळे संवर्धन, कार्यक्रम अधिकारी डॉ. जयमाला चंद्रात्रे – लिंगभाव संवेदनशीलता, प्रा.तुषार वाघ अपारंपारिक ऊर्जा डाॅ. डी. के.आहेर (रा. से. यो. नाशिक जिल्हा समन्वयक)- अन्नसुरक्षा जनजागृती इ. विषयांवर व्याख्याने झाली.
Deola | देवळ्याच्या भदाणे कुटुंबीयांकडून काळाराम मंदिरात नैवेद्य
शिबिर समारोप प्रसंगी शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी शिवराज्याभिषेक सोहळा विषयी आपले विचार मांडलेत. राष्ट्रीय सेवा योजना नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिबिरात केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. मविप्र संचालक विजय पगार यांनी विद्यार्थ्यांच्या कामाची पाहणी करून केलेल्या कामाचे कौतुक केले. स्वयंसेवक विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या मनोगतात शिबिरातील अनुभव सांगितला. तसेच प्रत्येक गटातील उत्कृष्ट स्वयंसेवकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ह.भ.प. सुकानंद महाराज, रामेश्वर येथील सरपंच केवळ गांगुर्डे, उपसरपंच सुनील पगार, डॉ. सुनील आहेर, पंकज जाधव, पोपट पगार, गोविंद पगार, प्रा. तुषार वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम आधिकारी प्रा. अशोक गुजरे, प्रा. सचिन भामरे, बाबाजी आहेर, जयेश निकम आदींसह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. डॉ. राकेश घोडे यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम