सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा कनकापुर, कांचणे येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या नोंदणीसाठी सोमवार दि.५ ते ७ ऑगष्टपर्यंत शिबीर आयोजित केले असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी केले आहे.
Deola | देवळा येथील युवा संवाद मेळाव्यात युवकांकडून केदा आहेर यांच्या उमेदवारीची मागणी
राज्यातील महायुती सरकारने वयाच्या ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना अंमलात आणली असून, त्यांना वयोमानानुसार शारीरिक असमर्थततेमुळे लागणारे आवश्यक साहित्य जसे की (चष्मा, श्रवणयंत्र, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट) इ. उपकरण खरेदीसाठी जेष्ठ नागरिकांना ३००० रूपये अनुदान मिळणार आहे. योजनेचा शुभारंभ सोमवारी (दि.५) रोजी कणकापूर, कांचणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, कर्मचारी व प्राथमिक उपआरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम