सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे (ता. देवळा) येथील शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे जिल्हा सह संपर्कप्रमुख विजय जगताप यांची ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. खर्डे ता देवळा येथील ग्रामपंचायतीची सरपंच अर्जुन मोहन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२) रोजी ग्रामसभा झाली. यात विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी, अशी मागणी ग्रामसभेत झाल्यानंतर यावेळी सर्वानुमते शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विजय जगताप यांची निवड करण्यात आली व तसा ठराव संमत करण्यात आला.
Deola | महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या तालुका अध्यक्षपदी विनोद देवरे
यावेळी उपसरपंच सुनील जाधव सह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. जगताप यांच्या निवडीचे खासदार भास्कर भगरे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे, तालुकाप्रमुख बापू जाधव, उप जिल्हाप्रमुख सुनील पवार, विश्वनाथ गुंजाळ, प्रशांत शेवाळे, देवाण चव्हाण, सोमनाथ शिंदे, विलास शिंदे आदींसह सर्व क्षेत्रातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
खर्डे गाव मोठे असून, याठिकाणी अनेक प्रकारचे तंटे उद्भवतात. हे तंटे आता यापुढे पोलीस ठाण्यापर्यंत न घेऊन जाता सर्वांना सोबत घेऊन गावातल्या गावात मिटविण्यासाठी आपण प्रमाणिकपणे प्रयत्न करणार असून, या मध्यमातून शासनाकडून गावाला बक्षीसदेखील मिळवून देणार आहे.
– विजय जगताप, खर्डे (नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्ष)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम