सोमनाथ जगताप : प्रतिनिधी – Deola | देवळा येथील खामखेडा गावात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व चुकीच्या गोष्टींना आळा बसावा यासाठी ग्रामपंचायतीने गावातील महत्त्वाच्या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करत आदर्श गावाकडे वाटचालीची घोडदौड सुरू ठेवली आहे.
ह्या गावात बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे संपूर्ण दृश्य हे ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या स्क्रीनवर दिसणार आहे. ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र बोरसे यांच्या हस्ते येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज ह्या सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, यावेळी सरपंच वैभव पवार, उपसरपंच श्रावण बोरसे, सदस्य गणेश शेवाळे, अंबर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत मोरे, अनुप शेवाळे, दादाजी सोज्वळ, दिनकर आहेर, ग्रामविकास अधिकारी विजय सोळसे, लिपिक विजय शिरसाठ, विजय जाधव, सुरेश ढिवरे, दावल पानपाटील आदी उपस्थित होते.(Deola)
देवळा तालुक्यातील खामखेडा या गावात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, ह्या ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातुन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गावातील महत्वाच्या ठिकाणी एकूण १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावत ह्या ग्रामपंचायतीने विकासाच्या दृष्टीने नवे पाऊल टाकले आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीला आळा बसतो. त्यामुळे याचा विचार करता ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आणि ही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली. दरम्यान, त्यामुळे तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या तुलनेत त्यांनी एक पाऊल पुढे टाकत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.(Deola)
ह्या गावात एकूण १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असून यामुळे आता गावातील प्रत्येक हालचालींवर खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीचे नियंत्रण असणार आहे. त्यात प्रामुख्याने बस स्टँड, ग्रामपंचायत कार्यालय, राम मंदिर, बाजार गल्ली फिल्टर प्लॅन, मंगल कार्यालय, जनता विद्यालय शाळा, आदिवासी वस्ती याठिकाणी चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, याठिकाणी आता ग्रामपंचायतीची करडी नजर असणार आहे.
दरम्यान, यामुळे गावात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांवर, अवगमन करणाऱ्या वाहनांवर, फेरीवाले, भंगारवाले, भाजीवाले, सेल्समन अशा व्यक्तींच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय करडी नजर ठेऊन असणार आहे. तसेच चोरी, टवाळखोरी, बेकायदेशीर गोष्टी, गुन्हेगारी यांवर चांगलाच आळा बसणार आहे. तसेच एखादी घटना किंवा गुन्हा घडल्यास पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यासही यामुळे मदत होणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या ह्या कामाचे कौतुक केले आहे. (Deola)
गावातील नागरिकांची सुरक्षितता तसेच गुन्हेगारीला आळा बसविण्याच्या दृष्टीने सीसीटीव्हीची अत्यंत गरज असल्याने १५ व्या वित्त आयोगातुन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गावातील विकास, नागरिकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा कशा उपलब्ध होतील यावर आम्ही भर देत आहोत. नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून गावातील प्रत्येक हालचालीवर आता करडी नजर असणार आहे.
– वैभव पवार (लोकनियुक्त सरपंच, खामखेडा)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम