सोमनाथ जगताप -प्रतिनिधी : देवळा | मविप्र संस्थेच्या पिंपळगाव (वा) येथील जनता विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एन. डी. पाटील, उच्च माध्यमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप पाटील, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व उपसरपंच नदिश थोरात, दौलत वाघ, विश्वास पाटील, प्रवीण पाटील, दौलत खैरनार, भीमराव सावकार, दीपक थोरात, सिद्धार्थ पाटील, दिनेश पाटील, प्राचार्य जिभाऊ शिर्के, प्रभारी पर्यवेक्षक अशोक खैरनार, रवींद्र निकम, चंद्रशेखर चव्हाण, वैशाली निकम उपस्थित होते.
Deola | भावडे येथील एसकेडी व व्हीकेडी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
दौलत वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्काऊट ध्वजारोहण दीपक थोरात यांनी केले. उपशिक्षिका शितल देवरे, प्रियंका बच्छाव व त्यांच्या गीतमंचाने राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीत सादर केले. संविधान उद्देशिकेचे वाचन आयुष भामरे या विद्यार्थ्याने केले. स्काऊट गाईड व लेझीम पथकाच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. क्रीडाशिक्षक पवन निकम, हेमंत पवार, शिक्षक रवींद्र निकम, महेंद्र बच्छाव, सरोज जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुंदर असे फलक लेखन कला शिक्षिका रोहिणी आहेर यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रवींद्र निकम यांनी केले. आभार चंद्रशेखर चव्हाण यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम